स्टोरी

झोळंबे गावात आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झोळंबे गावात आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी झोळंबे सारख्या ग्रामीण गावात निःशुल्क निदान, चिकित्सा व औषध सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल झोळंबे वासियांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

झोळंबे प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्द्घाटन शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दोडामार्ग पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सरपंच विशाखा नाईक, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, माणगांवच्या परब हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ चेतन परब, डॉ स्वप्निल परब, डॉ दिव्या गवस, डॉ निकिता नाईक, आरोग्य सेविका मिरा कुरुडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाजी गवस, शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप घोगळे, उपाध्यक्ष मुन्ना गवस, सचिव हेमंत सावंत, खजिनदार विशाल गवस,माजी उपसभापती धनश्री गवस, जगदीश गवस, पोलिस पाटील संजय गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकर गवस, मुंबई मंडळ अध्यक्ष विष्णू गवस आदी उपस्थित होते.

सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील,, डॉ स्वप्निल परब, डॉ चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात लॅब टेक्निशियन अक्षय सावंत यांनी रुग्णांची ब्लड शुगरची तपासणी केली. या वैद्यकिय शिबिरात गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

यावेळी पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि शिवशक्ती ग्रामविकास मंडळ यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्रकाश तेंडुलकर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या शैक्षणिक सामाजिक व आरोग्य विषयक विविध उपक्रमांचे कौतुक करून प्रतिष्ठानच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. गणेशप्रसाद गवस यांनी शिवशक्ती ग्रामविकास मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत या आरोग्य शिबिरासाठी सिंधुमित्र प्रतिष्ठानने सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. शिवशक्ती ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप घोगळे, उपाध्यक्ष मुन्ना गवस सचिव हेमंत सावंत यांनी झोळंबे गावात आरोग्य शिबिर घेतल्याबद्दल आवरून व्यक्त केले.

या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भगवान रेडकर, आसिफ शेख, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर, डॅनियल फर्नांडिस, शिवशक्ती ग्रामविकास मंडळाचे सुधीर गवस, रुपेश गवस, विलास गवस, पांडुरंग गवस यांनी केले.


Spread the love

Related posts

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान! तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे प्रतिपादन…

news

दाभिल श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी..!

news

राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्काराने नवलराज काळे यांचा सन्मान…!

news

Leave a Comment