स्टोरी

व्हिक्टर डांटस विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या शिल्पा मर्गज – हिर्लेकर यांना विधी क्षेत्रातील पी. एच . डी . पदवी प्रदान.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:

व्हिक्टर डांटस चॅरिटेबल अँड एज्युकेशन फॉऊंडेशन संचलीत व्हिक्टर डांटस विधी महाविद्यालय, कुडाळ, येथे प्रभारी प्राचार्या या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रा. सौ. शिल्पा मर्गज – हिर्लेकर यांना राजस्थानमधील विद्यापीठामधून कायद्यामधील पी. एच . डी . पदवी बहाल झाली आहे.

सदर डॉक्टरेट पदवी साठी संशोधनाचा विषय हा “भारतीय संविधानाअंतर्गत ‘जगण्याचा आणि जीविताचा हक्क’ याबाबत मा. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची भूमिका” असा होता.

व्हिक्टर डांटस विधी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच म्हणजे सन २००८ पासून विधी महाविद्यालयामध्ये त्या कार्यरत आहेत. तसेच मागील १३ वर्षांपासून प्रभारी प्राचार्या म्हणून त्यांनी यशस्वीपणे विधी महाविद्यालयाचे कामकाज सांभाळले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. व्हिक्टर डांटस सर , मा. ॲड. संदेश तायशेटे सर, मा. ॲड. राजशेखर मलुष्टे सर तसेच विधी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. व्हिक्टर डांटस सर व इतर सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे अशी कृतज्ञता त्यांनी बोलून दाखवली.


Spread the love

Related posts

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा.

news

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद!

news

शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर द्यावा! खासदार अमोल कोल्हे

news

Leave a Comment