स्टोरी

कलंबिस्त हायस्कूल येथे आयोजित आरोग्य शिबीरात १५० हुन अधिक रुग्णांनी घेतला सहभागी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित कलंबिस्त व ग्रामपंचायत कलंबिस्त हायस्कूल व भांडुप येथील विजय क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये जवळपास दिडशेहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. या भागात विशेष करून नेत्र आजार समस्या अधिक आहे. या शिबिरातून निदर्शनास आले.

हा भाग आरोग्य व शैक्षणिक तसेच पशुसंवर्धन कृषी विकास या तीन सुत्री कार्यक्रमानुसार एक पायलट प्रोजेक्ट पंचक्रोशी म्हणून या गावाकडे निश्चितपणे उपक्रम राबवण्यात येतील, असे ठरवण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजू वीरनोडकर यांनी कलंबिस्त सैनिकी परंपरा असलेल्या या गावात आरोग्य शिबीर भरवण्यात आले आणि त्या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला येत्या काळात निश्चितपणे कायमस्वरूपी आरोग्य शिबिर कुठे संस्थेच्या माध्यमातून भरवले जाईल. या भागात आरोग्य दृष्ट्या हा गाव सुदृढ बनवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व संस्था प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले.

कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक संस्थेने सातत्याने या भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य व सामाजिक समस्या संदर्भात तसेच कृषी पशुसंवर्धन संदर्भात जे जे उपक्रम राबवत आहे. ते वाखाण्याजोगे आहेत. अशा शब्दात कलंबिस्त स्कूलचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी गौरव उद्गार काढले. कलंबिस्त हायस्कूल येथे मोफत नेत्र तपासणी व सर्व आजार याविषयी मार्गदर्शन व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त दुग्ध संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत सरपंच, सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, कल्याण कदम, भांडुप येथील विजय क्रीडा मंडळचे संतोष कासले,   हायस्कूलचे संचालक सूर्यकांत उर्फ बाळा राजगे, डॉ.ए.  एस. यादव, डॉ. दत्तकुमार कोयंडे. डॉ. कांचन विरनोडकर, डॉ. प्रथमेश प,. डॉक्टर प्रार्थ पई, दुग्ध संस्थेचे संचालक दत्ताराम कदम, सचिव रमेश सावंत, प्रकाश तावडे, दिपक विरनोडकर, प्रशांत विरनोडकर, ग्रामपंचायत सदस्य सौ रियासावंत, दिपक जाधव, सौ अर्चना सावंत, ज्येष्ठ ग्रामस्थ अनिल सावंत, दिनेश सावंत, श्री. पांगम, गुरुप्रसाद सावंत, पांडुरंग सावंत आधी उपस्थित होते यावेळी.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री विरनोडकर म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य धनसंपदा मिळावी या दृष्टीने आपण यश विरनोडकर स्मृती मोफत आरोग्य शिबिर भांडुप येथील विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भरवण्याचा संकल्प केला. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त माजी सैनिक परंपरा असलेल्या भागात दुग्ध सोसायटी आणि ग्रामपंचायत व हायस्कूल यांनी संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वी करून दाखवले. येथील लोकांच्या आरोग्यदृष्ट्या त्यांना सुदृढ बनवण्यासाठी संस्थेने घेतलेले परिश्रम आणि घेत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग दर्शवला. यापुढे दरवर्षी आम्ही या भागात शिबिर घेऊ असे ते म्हणाले. यावेळी हायस्कूल संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत म्हणाले. कलंबिस्त भागात दुग्ध संस्था शेतकऱ्यांच्या हिताबरोबर येथील लोकांच्या आरोग्यमान सुधरावे यासाठी समाज उपयोगी उपक्रम घेत आहे. हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. यावेळी भांडुप येथील विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्षश्री संतोष कासले म्हणाले, भांडुप येथे कामगार वस्ती आमची ही संस्था आम्ही चालवत आहोत. या ठिकाणी रुग्णसेवा ग्रंथालय व्यायाम शाळा माजी सेवा केंद्र तसेच शैक्षणिक उपक्रम आणि विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. गेली वीस वर्षे शेंदूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात हे जनजागृती अभियान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आम्ही घेतले आहेत. तसेच वृद्धाश्रमाचा उपक्रम आमचा आहे. आता आम्ही रुग्ण सेवेत काम करताना लाखो रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात दिला जात आहे. अशाप्रकारे आमचे विविध उपक्रम आहेत. कलंबिस्त येथे आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. असे ते म्हणाले. यावेळी दुग्ध संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत यांनी कलंबिस्त भागातील शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी ही संस्था नेहमी कार्यरत आहे. या भागा त तरुण-तरुणींना पशुसंवर्धनाच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही सातत्याने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. आम्ही ती सूत्री कार्यक्रम आहे. पशुसंवर्धन कृषी शिक्षण आणि आरोग्य अशा तीन क्षेत्रात आम्हाला भारी असे काम करायचे आहे आणि त्या दृष्टीने आमचे छोटे पाऊल आहे. शासनाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर व उपस्थितितांच्या आभार मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी मानले. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, योगा पंचक्रमाविषयी डॉक्टर प्रथमेश पई व डॉक्टर प्रथा पई यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना योगा व पंचक्रमाविषयी व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले तर डॉक्टर ए. एस. यादव, डॉ. दत्तकुमार कोयंडे, डॉक्टर कांचन विरनोडकर यांनी इतर आजारावर रुग्णांची तपासणी केली. या शिबिरामध्ये चष्मा चे वाटपही करण्यात आले. डोळ्यांचे आजार रुग्णांमध्ये अधिक आढळले. पुढील काळात या भागात खास विशेष नेत्र तपासणी घेऊन येतील गोरगरीब शेतकऱ्यांना आरोग्याची निगा बद्दल विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. असे स्पष्ट करण्यात आले. जवळपास दीडशेहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.


Spread the love

Related posts

असनिये सारख्या दुर्गम गावात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

इस्कॉनच्या वतीने भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन.

news

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यात विकास कामांचा धडाका…!

news

Leave a Comment