स्टोरी

पळसंबमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10 वाजता पळसंब ग्रामदेवता श्री.जयंतीदेवीला वंदन करत शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला.

त्यानंतर गावातील मुलांनी मल्लखांब,लाठीकाठी या साहसी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवत उपस्थितांची मने जिंकली. लोप पावत असलेल्या मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिके पाहताना खर्‍या अर्थाने मंडळाच्या माध्यमातून उभा केलेल्या मल्लखांबाबाबत चीज झाल्याचे वाटले. त्यानंतर वाहनाला फुलांनी सजवलेल्या रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची ढोल ताशाच्या गजरात जयभवानी जयशिवाजी ललकारी देत भव्यदिव्य रॅली काढण्यात आली . रॅली जि.प पूर्ण प्राथमिक शाळा पळसंबच्या मैदानात पोहचताच, शाळेतील शिक्षकांनी जोरदार स्वागत करत मुर्ती शाळेच्या रंगमंचावर विराजमान केली. त्यानंतर ब्राम्हण श्री. काणे यांनी विधिवत पूजा करत पुढील कार्यक्रम चालू झाला. त्यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे श्री. चोरगे यांनी उपस्थित राहत सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या .

उपस्थित देवठाण मानकरी अण्णा कापडी, पोलिस श्री. चोरगे, मुख्याध्यापिका सौ अनघा कापडी , प्रमोद सावंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती देत जुन्या ऐतहासिक आठवणीना उजाळा दिला.

जि.प पुर्ण प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष श्री. रविकांत सावंत, मुख्याध्यापक श्री. विनोद कदम , शिक्षिका सौ. अपूर्वा पवार सौ पल्लवी सोनगडे यांनी शाळेतील मुलांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ट्रिकसिनच्या आधारे खर्‍या अर्थाने जागा केला. मुलांचे सादरीकरण पाहताना पोलीस प्रशासन व शिवप्रेमी ग्रामस्थ पण काही काळ स्तब्ध झाले होते. सर्वच स्तरांतून मुलांचे कौतुक करण्यात आले .

यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री. अमित कांबळी , उपसरपंच श्री. अविराज परब, सदस्य श्री. बाळा तेजम, अक्षय परब, रुतुजा सावंत, माजी उपसरपंच मोहन आपकर, पुजा मुणगेकर, पोलीस पाटील सौ. पुनम गोलतकर ,देवस्थान मानकरी राजन पुजारे, बाळा पुजारे यांनी उपस्थित दर्शवली. त्यानंतर मंडळाच्या वतीने सौ. अपूर्वा पवार यांनी सर्व उपस्थितांनीचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचा समारोप केला .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, अमित पुजारे, हितेश सावंत, चंद्रकांत गोलतकर, बबन पुजारे, शेखर पुजारे, वैभव परब तसेच प्रमोद सावंत, दादा पुजारे, दाजी जुवेकर, विघ्नेश सावंत, रुपेश पुजारे, बंड्या तेजम गावातील तरुणांनी आणि महिलावर्गाने मोलाचे योगदान दिले.सर्वांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.


Spread the love

Related posts

“राधाकृष्ण चषक २०२५” हा सांगितिक महोत्सव उत्साहात संपन्न.

news

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडीतर्फे भव्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग संपन्न..!

news

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत रामचंद्र केसरकरचे यश!

news

Leave a Comment