स्टोरी

कलंबिस्त ते सावरवाड असा राज्यमार्गावरील रस्त्याचे काम येत्या २१ फेब्रुवारी पर्यंत हाती घेतले जाईल..! शिवसेना जिल्हा संघटक संजू परब

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ते सावरवाड असा राज्यमार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व कार्पेट चे काम येत्या २१ फेब्रुवारी पर्यंत हाती घेतले जाईल. या रस्त्याचे चांगले दर्जाचे काम निश्चितपणे सदर ठेकेदाराकडून करून घेण्याची ग्वाही शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी उपोषण करताना आश्वासन दिल्याने तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय कदम व सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत प्रथमेश सावंत, प्रल्हाद तावडे यांनी पुकारलेले उपोषण काल रात्री नऊ तीस वाजता मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, संचालक महेश सारंग, माजी आरोग्य सभापती एडवोकेट परिमल नाईक हे उपस्थित होते.

कलंबिस्त ते सावरवाड असा रस्ता डांबरीकरण व कार्पेट चे काम अर्धवट स्थिती ठेवण्यात आले होते. १५ फेब्रुवारी पर्यंत हे काम करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्याने दिली होती. पण ठेकेदाराने सदरचे काम हातीच घेतले नव्हते. त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण विजय कदम व गावातील युवकांनी सुरू केले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची मनधारणा केली. परंतु उपोषण करते आपल्या मताशी ठाम होते. अखेर रात्री नऊ वाजता आमदार दीपक केसरकर यांचे समर्थक शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग हेही उपस्थित होते. सदरचा रस्ता निश्चितपणे डांबरीकरण करून घेण्याचे हमी आपण देत असल्याचे श्री परब यांनी स्पष्ट केले. यावेळी सचिन सावंत, सुनील सावंत, किरण सावंत, निलेश पास्ते, एडवोकेट सुशील राजगे, राजेश पास्ते, राजेश सावंत, रघुनाथ सावंत,  रवींद्र तावडे आधी उपस्थित होते. या उपोषणाला कलंबिस्त सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, शिरशिंगे सरपंच दीपक राऊंळ, उपसरपंच सचिन धोंड, बाबा पास्ते, संदेश बिडये, राजू बिडये, अंतोन रोड्रिक्स, श्री फर्नांडिस आधी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

गौरी लंकेश प्रकरणातील मुख्य अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार! हल्ल्यामागे ‘पीएफआय’ कि नक्षलवादी याचा शोध घ्या!

news

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध!

news

श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे येथे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव 

news

Leave a Comment