शिक्षण

तळवडे येथील इंग्लिश मिडियम स्कूल ला आदर्श स्कुल म्हणून स्टार एज्युकेशन अवार्ड प्रधान

Spread the love

सावंतवाडी (तळवडे): तळवडे येथील इंग्लिश मीडियम स्कूल ला स्किल लर्निंग डेव्हलपमेंट बाबत उत्कृष्ट स्कूल म्हणून मुंबई येथील बीकेसी येथे एज्युकेशन सप्लाय अँड एक्सपरिमेंत २०२४ चा शिक्षण व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्टार एज्युकेशन अवार्ड प्रधान करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून स्टार अवॉर्ड स्किल डेव्हलपमेंट च्या धरतीवर शाळांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे ला उत्कृष्ट शाळा म्हणून या शाळेची निवड स्टार अवॉर्ड साठी करण्यात आली. मुंबई येथे हा अवॉर्ड प्रधान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे इंग्लिश मीडियम स्कूल ही नर्सरी ते दहावीपर्यंत जवळपास १५० विद्यार्थी ग्रामीण भागातील शिक्षणाचे धडे घेत आहेत. एक आदर्शवत अशी इंग्लिश मिडियम ची शाळा दुर्गम ग्रामीण भागात गेली दहा वर्षापासून कार्यरत आहे.

मुंबई बीकेसी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उत्कृष्ट शाळा म्हणून इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे ला स्टार अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. यावेळी या स्कूलचे सीईओ सौ. मैथिली मनोज नाईक व मनोज नाईक यांनी हे अवार्ड स्वीकारले. सावंतवाडी तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे शाळा दर्जेदार शिक्षणाचे धडे देत आहे. जवळपास १५ शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. या शाळेला स्टार अवॉर्ड मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव चंद्रकांत नाईक, खजिनदार व्ही.बी. आधी संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापक श्री. बांदेकर व आदी शिक्षक कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

यावेळी या स्कूलचे सीईओ सौ. मैथिली मनोज नाईक म्हणाल्या की, गेली दहा वर्ष या परिसरात इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून सर्व दर्जेदार शिक्षण येथे दिले जात आहे एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट च्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जात आहे यापुढेही व्यावसायिक अभ्यासक्रम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.


Spread the love

Related posts

विनया सातार्डेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद…! किशोर काळे.

news

पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा !

news

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या पहिल्या तुकडीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

प्रसाद परब

Leave a Comment