राजकारण

आ. वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच; पेंडूर परबवाडी येथील राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Spread the love

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर-परबवाडी येथील अनेक राणे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.पेंडुर गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते पेंडुर गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून आहे.त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडु देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

यावेळी महेश परब,विश्राम परब,सदानंद परब, सुहास परब, अनंत परब,लक्ष्मण कदम, विलास परब, दत्ताराम सावंत, यशवंत परब, भारत परब, नामदेव परब, रुणाली परब, कृतिका परब, क्रांती परब, भारती गावडे, भावना प्रभु, संचिता परब, अमिता परब, विणा परब, ऋषिकेश गावडे,सिद्धेश बिरमोळे, अमोल कदम,सहदेव परब,ललित परब या राणे समर्थकांनी शिवसेनत प्रवेश केला आहे

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, विभागप्रमुख शिवा भोजने,बाबु टेंबुलकर,रुपेश आमडोसकर,विभाग समन्वयक भुषण ढोलम,युवासेना विभाग प्रमुख वंदेश ढोलम,शाखाप्रमुख निलेश हडकर,प्रदीप सावंत,माजी उपविभाप्रमुख रामु सावंत,मनोज राऊळ, किशोर पेंडुरकर,युवासेना शाखाप्रमुख राजु पेंडुरकर, संतोष परब, शांती नाईक, संतोष नागवेकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात!

news

महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे! सरकारच्या वतीने त्यांना जे चांगले देता येईल ते देण्याची आमची जबाबदारी आहे! देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

news

बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले!-निलेश राणेंचा गौप्यस्फोट

news

Leave a Comment