स्टोरी

पायाची शस्त्रक्रिया केलेल्या भोईचे केरवडे येथील नागरिकाला आमदार वैभव नाईक यांनी औषधोपचारासाठी केली आर्थिक मदत

Spread the love

सिंधुदुर्ग: सर्वसामान्यांचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे येथील पायाची शस्त्रक्रिया केलेल्या दीपक भोई यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. दीपक भोई यांची काही दिवसापूर्वी पायाची शस्त्रक्रिया झाली होती.शिवसेना विभागप्रमुख गुरु सडवेलकर यांनी दीपक भोई यांच्या आर्थिक स्थितीबाबत आणि पायाचा शस्त्रक्रियेबाबत आमदार वैभव नाईक यांना माहिती दिली होती. त्यानुसार आ. वैभव नाईक यांनी दिपक भोई यांना आधार देत औषधोपचारासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आर्थिक मदत केली.

 

यावेळी शिवसेना विभागप्रमुख गुरु सडवेलकर ,मुंबई येथील ज्येष्ठ शिवसैनिक विनायक (भाई) परब, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, उपशाखाप्रमुख संतोष परब, राजू भोई, गिरीश सावंत आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.


Spread the love

Related posts

सैनिक परंपरा असलेला कलंबिस्त गावात बाहेरील व्यक्तींना जमीन न विकण्याचा एकजुटीने ठराव मंजूर.

newss

जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन रविवारी २९ डिसेंबर रोजी माणगाव ग्रंथालयात होणार

news

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत लागणार!

news

Leave a Comment