स्टोरी

कावळेसाद वरील जमिनीवर कोणाचा डोळा? दिपक केसरकरांचा विरोधकांवर निशाणा.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: भाजप चे पदाधिकारी संदिप गावडे यांनी गेळे कबुलायतदार प्रकरणी उपोषण केल्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. गेले दहा वर्ष केंद्रात बीजेपीचे सरकार आहे. तसेच राज्यातही बीजेपीचे वर्चस्व आहे. असे असतांना गेळे कबुलायतदार प्रकरणाबाबत भाजप चे पदाधिकारी आणि महत्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदिप गावडे यांनी हे उपोषण करणं म्हणजे सत्ताधाराकांच्या विरोधातच सत्ताधारी अशी चर्चा सुरु आहे. गेले दहा वर्ष बीजेपी केंद्रात असताना हा प्रश्न सुटला पाहिजे होता. अशी चर्चा होत आहे. तसेच पुढील विधानसभा निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर संदीप गावडे यांनी स्टंटबाजी केली अशी चर्चा सुरू आहे. असं असतांना शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गेळे कबुलायतदार प्रकरणी प्रकरणावरून आता विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले की, कावळेसाद येथील जमिनिवर कोणाचा डोळा आहे. सिंधुदुर्गात सध्या जमिनी विकत घेण्याचा सपाटा कोणी लावला असे संतप्त सवाल करीत आंबोली, गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्री आपण गेली वीस वर्षे लढा देत आहे. हे गेळे येथील मंडळीनी तेथील रवळनाथ मंदिर येथे येऊन देवाला स्मरून नाकारावे असे आवाहन शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे.

कोणीतरी आपला मतदारसंघ आरक्षीत झाला म्हणून आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात येऊन स्वतःच्या स्वार्थाचे राजकारण करून गावातील मंडळींची दिशाभूल करीत असेल व गावकरी त्याला बळी पडत असतील तर हे योग्य नाही. खऱ्याखोट्याचा न्यायनिवाडा हा परमेश्वर निश्चितच करेलच असे सांगत तुम्ही तुमचे राजकारण जरूर करा. मात्र त्या राजकारणात मला ओढू नका. असा आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला आहे.

गेळे जमीन वाटप प्रश्नी शिक्षण मंत्री दीपक केसरकर खो घालत असल्याचा आरोप करीत आहे. ग्रामस्थांनी प्रसंगी गाव बंदी करू असा निर्णय घेतला होता. यावर आज बोलताना केसरकर यांनी कावळे साद येथील जमीन राखीव ठेवण्याचे सांगण्यात आले होते. मात्र शासनाला जेवढ्या जागेची गरज आहे तेवढीच घेऊन बाकीची जागा वाटप केली जाणार आहे,मात्र ज्यांना जमिनीमध्ये स्वारस्स आहे. कावळे साद मधील जमिनीवर ज्यांचा डोळा त्यांचा शोध गेळे वासियांनी घ्यावा असे आवाहन केले.

ज्यांनी जिल्ह्यात जागा घेण्याचा सपाटा लावला आहे. अनेक ठिकाणच्या जागा खरेदी केल्या जात आहे त्यामुळे गेळे कावळेसाद जागेवर कोणाचा तरी डोळा असेल असा टोला शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी लगावला.


Spread the love

Related posts

कोंकण रेल्वे मार्गावर मंगळवारी मेगाब्लॉक ; दोन गाड्या उशिराने धावणार

news

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात १०जुलै रोजी पौर्णिमा उत्साहात साजरी.

news

आंबोली येथे आजपासून शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम.

news

Leave a Comment