सनातन

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न !

Spread the love

‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे ! श्री.हेमंत मणेरिकर 

कणकवली: काळमहिम्यानुसार रामराज्य येणारच आहे. जसे ‘पहाट होणे’ कुणी थांबवू शकत नाही, तसे ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे निर्माण’ कुणीही थांबवू शकत नाही. ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही, तर साथीदार व्हायचे आहे. आपणही रामराज्यात रहाण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचे, तर ‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे. सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया.” असे प्रतिपादन श्री.हेमंत मणेरिकर यांनी ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवर मार्गदर्शन करतांना केले. ते सनातन संस्थेच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी तसेच देशभरात एकूण ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

 

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते. या महोत्सवांत धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले. गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ सुद्धा दाखवण्यात आली.

६ भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरात, तमिळ, मल्याळम् या ६ भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैदेही खाडये हिने केले.


Spread the love

Related posts

मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या हिंदु धर्मयोद्ध्यांचा कोल्हापुरात भव्य सत्कार !

news

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला..! ध्वजावर कल्पवृक्ष आणि कामधेनू यांची प्रतिमा!

news

हिंदू जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम ! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’!

news

Leave a Comment