स्पोर्ट

सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाचे खेळाडू जिल्हास्तरासाठी पात्र.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी (आंबोली): सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या कॅडेट ओम मंगेश निकम याने चौदा वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. कॅडेट कणाद मिलिंद कुलकर्णी याने एकोणीस वर्षाखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला. दोन्ही खेळाडू विजेतेपद पटकावून जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत.

कॅडेट ओम मंगेश निकम
कॅडेट कणाद मिलिंद कुलकर्णी

माध्यमिक विद्यालय मळगांव येथे दि. १९ जुलै २०२४ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते खेळाडू व क्रिडाशिक्षक सतिश आईर व मनोज देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डा डॉन्टस,सर्व संचालक, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे यांनी करून पुढील जिल्हास्तराकरिता शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

मसुरे डांगमोडे येथे २९ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा.

news

जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे १४,१७,१९ वयोगटातील संघ विभाग स्तरासाठी पात्र. 

news

खेलो इंडिया २०२५  सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंत गोल्ड आणि सिल्वर मेडल असा डबल धमाका.

news

Leave a Comment