स्टोरी

साटम महाराजांचा जयंती उत्सव अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवार १० एप्रिल रोजी साजरा होणार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवार १० एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.

यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, पहाटे ५:१५ वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ८ वाजता साटम महाराज समाधी पूजन व विधिवत पाद्यपूजा दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार असून होणार आहे.

भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंत भोसले यानी केले आहे.


Spread the love

Related posts

सकल हिंदू संमेलन समन्वय समिती तर्फे सिंधु मित्र आनंद मेस्त्री व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांचा सत्कार.

मंत्र्याकडून स्वत:च्याच खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप, रवींद्र चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

news

सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक शाळेतील ३० विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

news

Leave a Comment