क्राईम

बांदा पोलीसांकडून गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी मध्यरात्री कोलगावं येथील विराज लक्ष्मीकांत वाडकर (२०, रा. कोलगाव काजरकोंड) व प्रशांत कोठावळे (रा. कोलगाव मारुती मंदिर जवळ) ताब्यात घेतले आहे.  १ लाख ३२ हजार रुपयांची दारू व सुमारे ७ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला आहे. सदर कारवाई इन्सुली चेकपोस्टवर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.  टेम्पोच्या हौद्यात दारू वाहतुकीसाठी स्पेशल चोरकप्पा तयार करून त्यातून दारू वाहतूक करीत होते. हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर बर्डे, पोलीस हवालदार चंद्रशेखर मुणगेकर, रामचंद्र तेली, सिद्धार्थ माळकर, सीताकांत नाईक व पोलीस नाईक तुषार वाघाटे यांच्या पथकाने केली.


Spread the love

Related posts

रत्नागिरीत पैशांच्या वादातून मैत्रिणीचा खून : आरोपीला जन्मठेप

news

कणकवली जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड! १२ जण पोलिसांच्या ताब्यात.

news

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात!

news

Leave a Comment