स्टोरी

राजवाडा, सावंतवाडी येथे दि. २८ जानेवारी रोजी ‘लोककला महोत्सवाचे’ आयोजन…!

Spread the love

सावंतवाडी: येथील राजवाडा येथे सहयोग ग्रामविकास मंडळ गरड, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता “लोककला महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व येथील लोककला टिकाव्यात व त्या वृदींगत व्हाव्यात या हेतूने राजवाडा सावंतवाडी येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते १०.३० वा “लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित लोककला मंडळे यांच्या कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, छायानाट्य, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ, गोफनृत्य, चपई नृत्य, समई नृत्य, वासुदेव, पांगुळबैल अशा लोककलांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी.देसाई, सहाय्यक संचालक अँड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदि उपस्थित राहाणार आहेत. या लोककला महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत लोककलावंत सहभागी होणार आहेत, माहिती आज एसपीके महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान युवराज लखन सावंत भोसले यांनी दिली.

दशावतार महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून जिल्ह्यातील विविध दशावतारी मंडळांना व कलाकारांना या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व युवराज लखन सावंत भोसले यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली यावेळी प्रभारी प्राचार्य एमए ठाकूर, प्राध्यापक दिलीप गोडकर, डॉ. बी. एन. हिरामणी, प्रा. डॉ. गणेश मर्गज, प्रा. बाळासाहेब नंदीहळळी, राजेंद्र बिरजे अण्णा देसाई व बाळ धुरी आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित निबंध स्पर्धेत दोघा सख्ख्या बहिणीअनुक्रमे प्रथम व द्वितीय…!

news

भारतविरोधी पोस्टर हटवण्याचे आदेश! खलिस्तान समर्थकांबाबत कठोर भूमिका…..

news

“शंभो जय जय श्री रवळनाथ” या व्हिडिओ भक्तिगीताच्या प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न….!

news

Leave a Comment