स्टोरी

घाडीगांवकर समाज भवन निर्मिती निधी संकलन सुरु…!

Spread the love

सिंधुदुर्ग विभागात पंचक्रोशी समित्या स्थापन करण्यास प्रारंभ…!

 

सिंधुदुर्ग: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाज संस्था येत्या १ मार्च रोजी महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून समस्त घाडीगांवकर समाज बांधवांनी सुसज्ज असे घाडीगांवकर समाज भवन बांधण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाने जिल्हयात पंचक्रोशी बैठका घेऊन निधी संकलन करण्यास सुरुवात केली आहे.

नियोजित घाडीगांवकर समाज भवनासाठी कणकवली तालुक्यातील वागदे येथे यापूर्वीच जागा घेण्यात आलेली आहे. या समाजभवन उभारणीमध्ये समस्त घाडीगांवकर समाज बांधवांना सहभाग घेता यावा यासाठी सिंधुदुर्ग विभागाने पंचक्रोशी मर्यादीत समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कार्यवाहीही सुरू केली आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या देवगड तालुक्यातील नारीग्रे आणि शिरगाव, मालवण तालुक्यातील शिरवंडे तर कुडाळ तालुक्यातील घावनळे येथे क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या पंचक्रोशी मर्यादीत समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

समाज भवन बांधणीसाठी निधी संकलन सहज आणि सुलभ व्हावे यासाठी तसेच समाज भवन निर्मिती कार्याबाबत प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या पंचक्रोशी मर्यादीत समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये पंचक्रोशी प्रणित बैठकांच्यावेळी समस्त घाडीगांवकर समाज बांधवांमध्ये समाजभवना बाबत उत्सुकता तसेच तळमळ दिसून आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उर्वरित पंचक्रोशी स्थापन करण्यासाठी लवकरच बैठका घेण्यात येतील. या पंचक्रोशी स्थापनेसाठी घाडीगांवकर समाज बांधवांनी पुढे यावे असे आवाहन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग विभागाने केले आहे.

नियोजित घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यामध्ये जिल्हयातील ज्या समाज बांधवांना सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष सूर्यकांत घाडी ( ९४२२९६७३७४ ) किंवा सचिव प्रदीप घाडी (८३८१०४६६१९ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा प्रचार प्रसार समिती प्रमुख पत्रकार विजय गांवकर यांनी केले आहे .


Spread the love

Related posts

संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा १२ जूनला पुण्‍यात मुक्‍काम!

news

जोसोली फणसखोल येथील प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरावस्था!

news

एका गावात एकच दूध संस्था असावी! मनीष दळवी

news

Leave a Comment