स्टोरी

हेदूळमध्ये रस्त्याच्या कामाचे उदघाटन व बौद्धवाडी समाज मंदिराचे भूमिपूजन…!

Spread the love

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, हरी खोबरेकर यांची प्रमुख उपस्थिती.

 

सिंधुदुर्ग: खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कसाल, हेदूळ, खोटले, वायंगवडे, गोळवण इजिमा क्र. ४० या रस्त्यासाठी ६५ लाख रु. निधी मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाचे उदघाटन रविवारी खा. विनायक राऊत ,आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर खा. विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधी मधून हेदूळ बौद्धवाडी येथे समाज मंदिर उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान यावेळी हेदुळ श्री देवी माऊली मंदिर येथे खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उद्योजक आशिष परब, उप तालुकाप्रमुख बाळ महभोज, छोटु पारकर,भाऊ चव्हाण, पंकज वर्दम,अवधूत मालणकर, हेदुळ मा. सरपंच नंदू गावडे, वायंगवडे मा. सरपंच आनंद सावंत, उपविभाग प्रमुख निलेश पुजारे, विठ्ठल गावडे, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, खोटले सरपंच सुशील परब, शाखा प्रमुख संतोष हेदुळकर, उपशाखा प्रमुख भिकाजी पुजारे, दीपक पुजारे, आनंद सावंत, मिलिंद हेदुळकर, रमेश हेदुळकर, महेश पुजारे, सुदाम पुजारे, प्रकाश पुजारे, संचिता सावंत, प्राची मोरे, दर्शना पुजारे, महिला विभाग प्रमुख आरती नाईक, भगवान कानडे, विश्वास सावंत, सिद्धार्थ हेदुळकर, संतनु हेदुळकर, डॉ. नंदु हेदुळकर, प्रमोद हेदुळकर, शिलरत्न हेदुळकर, आनंद हेदुळकर, मोहन हेदुळकर, अनिल हेदुळकर, सुहास हेदुळकर, भास्कर हेदुळकर, चंदू हेदुळकर, अक्षय हेदुळकर यांसह हेदुळ, खोटले, वायगवंडे गावातील शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कु. स्वानंदी गावकर या विद्यार्थिनीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात.

news

एस. जी. फाउंडेशनच्या वतीने बावळाट आणि सातुळी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र ‘जिवन शिक्षण’ मध्ये शुभांगी लोकरे-खोत यांचा लेख प्रकाशित.

news

Leave a Comment