स्टोरी

सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांचे आज आंदोलन…!

Spread the love

सिंधुदुर्ग: कोकणातील विकास प्रश्नावर कोकणातले लोकप्रतिनिधीं भलेही उदासिन असतील, मात्र कोकणातील पत्रकार जागरूक आहेत..कोकणच्या विकासाच्या प्रश्नावर कोकणातील पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे.. त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणून मुंबई – गोवा महामार्गाकडे बघावं लागेल.. कोणत्याही राजकीय पक्षानं कितीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई – गोवा महामार्गाचं श्रेय हे कोकणातील पत्रकारांचंच आहे.. महामार्गासाठी गेली 18 वर्षे पत्रकार लढत आहेत.. या काळात सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून होते.. आता निवडणुका जवळ आल्यानंतर काही राजकीय पक्षांनी चार दोन दगड फेकून या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला..

 

सिंधुदुर्गमधील पत्रकार आज कोकणच्या विकासाचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग नगरीत नगरपंचायत व्हावी अशी पत्रकारांची मागणी आहे.. मुख्यालय झालं तेव्हा नवनगर विकास प्राधिकरण तयार करण्यात आलं.. मात्र ही व्यवस्था पूर्णता अधिकाराच्या हातात असल्याने विकास खुंटला आहे.. त्यामुळेच सिंधुदुर्ग नगरीत नगरपंचायत व्हावी अशी पत्रकारांची मागणी आहे.. मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे आणि सचिव लहू महाडेशवर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आजच्या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.. सरकारने पत्रकारांची ही मागणी मंजूर करून सिंधुदुर्गच्या विकासाला चालना द्यावी अशी परिषदेने मागणी केली आहे…


Spread the love

Related posts

वेरळ (वेरली) येथील तरुणाचे मुंबईत निधन.

news

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना व पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न.

news

कलंबिस्त – धावगिरेश्वर परिसरातील ओहोळात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून कच्चा वनराई बंधाऱ्यांची उभारणी.

newss

Leave a Comment