स्टोरी

वैभववाडी येथे युवासेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद….!

Spread the love

सिंधुदुर्ग: युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिरास वैभववाडी तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रवींद्र, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली.* *यावेळी संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे युवा सेनेच्या कार्या कौ तुक देखील केले.

 

वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे या शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती या शिबिरात 189 नागरिकांनी मोतीबिंदूची तपासणी केली यामध्ये मोतीबिंदू असलेले 74 रुग्ण सापडले . या 74 रुग्णांवर येता महिनाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, शस्त्रक्रियेनंतर लागणाराा चष्मा हे युवासेनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख -संदेश पारकर, विधानसभा प्रमुख – सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख -अतुल रावराणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख -सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख- नंदू शिंदे, तालुकाप्रमुख -मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य -संदीप सरवणकर ,युवासेना जिल्हा चिटणीस -स्वप्निल धुरी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख- जावेद पाटणकर , रज्जब रमदुल, शहर प्रमुख – शिवाजी राणे, नगरसेवक -मनोज सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख- अतुल सरवटे, युवासेना तालुकाप्रमुख- रोहित पावसकर , विभाग प्रमुख- विठोजी पाटील ,अनिल नराम, यशवंत गवानकर, राजेश तावडे , गौस पाटणकर, विलास पावसकर, पांडुरंग पांचाळ, सुनील कांबळे , भीमराव भोसले , राजाराम गडकर , शाबन राऊत, समीर लांजेकर, मयूर दळवी ,संतोष पाटील ,महेश रावराणे , श्रीकांत डाफळे, रवींद्र रावराणे, अनिता करकोटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*


Spread the love

Related posts

किर्लोस ते आंबवणे खांदारवाडी रस्त्याचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.

news

आजपासून सावंतवाडीकरांना अनुभवता येणार नरेंद्र वन उद्यान निसर्गभ्रमंती…!

news

स्नेहा विठ्ठल कदम यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कवी भीमराव कोते काव्य पुरस्कार जाहीर.! 

news

Leave a Comment