स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून रामदास गवळीला जीवदान….!

Spread the love

सावंतवाडी: कित्येक दिवस माठेवाडा आत्मेश्वर तळीकडे आजारी अवस्थेत पडून असलेला रामदास गवळी वय वर्ष ३५ याची माहिती सामाजिक बांधिलकीला नंदू गावडे यांनी दिली असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व संजय पेडणेकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस कर्मचारी पि.के कदम स्वतः ॲम्बुलन्स घेऊन दाखल झाले. सदर रुग्ण कित्येक दिवस आजारी असल्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला दुर्गंधी सुटली होती. सर्वप्रथम त्याला स्वच्छ आंघोळ घालून तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले.

सदर युवकाची अवस्था फार गंभीर असून त्याला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यावर अधिक उपचार डॉक्टरांकडून चालू आहेत. त्याचप्रमाणे त्याचे नातेवाईक कुडाळ येथे राहतात अशी माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पि. के. कदम त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या सेवाभावी कार्यासाठी सामाजिक बांधिलकीला मोलाचे सहकार्य सचिन गिरी, विशाल गिरी व मयूर आंचेकर यांनी केले.


Spread the love

Related posts

चालती बोलती केंद्रे निर्माण करा: गुरुमाऊली श्रीआण्णासाहेब मोरे

news

मळगाव वाचन मंदिरात दशावतार कलाकारांना ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन.

news

१२ ऑगस्‍टला पुणे येथील नवीन उड्डाणपुलाचे उद़्‍घाटन !

news

Leave a Comment