स्टोरी

युद्धनौका तारकर्ली समुद्रात दाखल….!

Spread the love

मालवण: नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवण तारकर्ली समुद्रात मंगळवारी सायंकाळी दाखल झाला. नौदलाने तारकर्ली समुद्रात सराव केला. या सरावाच्या वेळी आयएनएस विक्रमादित्य आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र, आयएनएस सुभद्रा आदी युद्ध नौकांनी तारकर्ली समुद्रात एकागोमाग एक दाखल होत सराव संचालनात सहभाग घेतला. तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टरनी चित्त थरारक कसरती केल्या. एअर क्राफ्टच्या आवाजाने आसमंत गेला दणाणून गेला. मरीन कमांडोंसह अन्य नौदलाचे विभागही सामील झाले होते. नौदलाचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली किनारी नागरिकांनीही मोठी गर्दी झाली होती.

 

सायंकाळीं पाच वाजता नौदलाचे मरीन कमांडो आकाशात पॅराशुट मधून खाली उतरत नौदलाच्या सरावाला सुरुवात झाली. निश्चित केलेल्या पॉइंट वर एका मागोमाग एक असे भारताच तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकवत पॅराशुट द्वारे कमांडो खाली जमिनीवर उतरले. या नंतर आकाशात तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्टनी आपल्या कसरती दाखविल्या. तारकर्लीच्या आकाशात लडाऊ विमानांनी कसरती चालू झाल्या नंतर त्यांच्या आवाजाने आसमंत दणाणला.

 

समुद्रात तयार करण्यात आलेली दुष्मनांची चौकी बाँबच्या साहाय्याने कशी उध्वस्त केली जाते. हेलिकॉप्टर मधून कसे उतरले जाते याबाबत मरीन कमांडोंनी आपलीं क्षमता दाखवून दिली. टार्गेट उध्वस्त केल्या. नंतर या कमांडोंना नौदलाच्या हॉलिकॅप्टर मधून परत एअर लिफ्ट करत सुरक्षित माघारी तळावर उतरविण्यात आले.

 

याच बरोबर युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाच्यांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

 

खोल समुद्रात असलेल्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेने या सरावात सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. या युद्ध नोकेवरून काही लडाखू विमाने समुद्रातून आकाशात झेपावले होती. त्यांच्या कसरती पार पडल्या नंतर ही लडाखू विमाने विक्रमादित्यवर पुन्हा माघारी गेली.

 

तारकर्ली समुद्रात नौदलाच्या संचलनात विनाशिका, फ्रि-गेट्स, कॉवेंट्स व क्षेपणास्त्र वाहू नौका, जलद हल्ल्याच्या युद्धनौका, सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर ध्रुव हे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टर आणि तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्ट आपल्या कसरती दाखविल्या.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महानीय व्यक्ती यांच्या उपस्थितीत मालवण तारकर्ली येथे साजरा होणाऱ्या नौसेना दिनची तयारी मालवण तसेच तारकर्ली येथे प्रशासन व नेवीच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर तारकर्ली समुद्रात नौसेनेचा चित्तथरारक सराव सायंकाळी सुरु होता. हा सराव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पुढील चार दिवस अश्याच पद्धतीने हा सराव सुरु राहणार आहे.


Spread the love

Related posts

चंद्रग्रहणामुळे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दिनक्रमात बदल!

news

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर..!

प्रसाद परब

सिंधुदुर्ग येथे खासगी वाहन चालक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओ प्रशासनाचा मोठा दणका!

news

Leave a Comment