स्टोरी

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान कर्मचाऱ्यांना दिवाळी स्वामी प्रसाद वाटप!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीने एका महिन्याच्या वेतनाइतके बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) व मुंबई येथील स्वामी भक्त

ॲड.मधुकर वैद्य व सहकारी यांच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व मधुकर वैद्य यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त असून स्वामींच्या सेवेतच आपले जीवन व्यतीत करणारया सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवस्थानच्या वतीने बोनस व आमच्या वतीने मिठाई वाटप करुन देवस्थानच्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हास व देवस्थान समितीस असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी मधुकर वैद्य, ॲड. मजहर शेख, व सहकाऱ्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी या स्वामी प्रसाद व मिठाईचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, ईश्वर परदेशी, प्रसाद सोनार, जयप्रकाश तोळणूरे, श्रीपाद सरदेशमुख, संदिप दुधनीकर, गिरीश पवार, संजय पवार, नरसप्पा मस्कले, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

दोडामार्ग तालुक्यातील पडवे माजगाव इको सेन्सिटिव्ह झोनमधील लोह खनिज उत्खनन विरोधात माजी मा. आमदार उपरकर आक्रमक

news

आंबोली घाटात आयशर आणि बसमध्ये अपघात.

news

अभिजित जाधव यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर.

news

Leave a Comment