स्पोर्ट

शासनाच्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजयराव नाईक फार्मसी कॉलेज शिरवल येथे दिमाखात उदघाटन….

Spread the love

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन….

महाराष्ट्रातून एकूण २४० स्पर्धक सहभागी; विजयी तीन स्पर्धकांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी होणार निवड….

आ. वैभव नाईक यांनी स्पर्धेला भेट देऊन बुद्धिबळ खेळत स्पर्धेचा लुटला आनंद….

सिंधुदुर्ग: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने व युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल येथे आयोजित करण्यात आली आहे. आज या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे दिमाखात उदघाटन कॉलेजचे सचिव डॉ. रमन बाणे,सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार पडले. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी या स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांना मार्गदर्शन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी आ. वैभव नाईक यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासमवेत बुद्धिबळ खेळून स्पर्धेचा आनंद लुटला.

 

३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत तीन दिवस ही स्पर्धा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातून मुंबई,पुणे,नागपूर,कोल्हापूर, नाशिक, छ. संभाजी नगर,लातूर, अमरावती या विभागातून १४,१७, १९ वर्षाखालील मुले-मुली असे एकूण २४० स्पर्धक सहभागी झाले आहेत.पुढील दोन दिवस बुद्धिबळ खेळाडूंमध्ये चुरशीची लढत होणार आहे. स्पर्धेतून विजयी झालेल्या तीन विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी होणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी दु. ३ वाजता स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे.

यावेळी उद्योजक संकेत नाईक, सचिन आचरेकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,जिल्हा बुद्धीबळ असो. सचिव श्रीकृष्ण आडेलकर, उपमुख्य पंच आरती मोदी, चेस सरकलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुयोग धामापूरकर,रोहित पोळ,पंढरीनाथ चव्हाण,कॉलेजचे प्र. प्राचार्य चंद्रशेखर बाबर, प्रा.अमर कुलकर्णी,प्रा. संजय लोहार, प्रा. नेहा गुरव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्वेता शिरोडकर,प्रा.शामली राणे यांनी केले.


Spread the love

Related posts

पळसंब येथे विद्यार्थ्यांना मिळणार मल्लखांब प्रशिक्षण…..! 

news

खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन.

news

सावंतवाडीचा रामदास राऊळ सिंधुदुर्ग श्री चा मानकरी!

news

Leave a Comment