स्टोरी

हमासने ‘त्या’ तरुणीचं मुंडकं छाटलं! इस्रायली राष्ट्रपतींचा दावा

Spread the love

देश विदेश: हमासच्या दहशतवाद्यांनी एका २३ वर्षीय शनी निकोल लोऊक नावाच्या तरुणीचं अपहरण करून तिची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली होती आणि काहीजण संबंधित तरुणीच्या मृतदेहावर थुंकले होते. हा अति क्रूरतेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जगभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तसेच जगभरातून याबाबत निषेध करण्यात आला. मृत शनी लोऊकबद्दल इस्रायलचे राष्ट्रपती यित्झचॅक हर्झोग यांनी सोमवारी मोठा दावा केला. हमासच्या दहशतवाद्यांनी तिचं शीर धडापासून वेगळं केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायली राष्ट्रपतींनी केला.

जर्मन वृत्तपत्र ‘डेली बिल्ड’शी संवाद साधतांना इस्रायली राष्ट्रपती हर्झोग यांनी सांगितलं, “मला हे सांगण्यास अत्यंत दु:ख होतंय की, शनी निकोल लोऊकची हत्या झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. इस्रायली पथकाला तिची कवटी सापडली आहे. याचा अर्थ हमासच्या रानटी दहशतवाद्यांनी तिचं मुंडकं छाटलं होतं.”

इस्रायली राष्ट्रपतींनी पुढे असंही सांगितलं की, पीडित तरुणीची ओळख पटवण्यास इतका वेळ लागला कारण हमासने लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले आहेत. त्यांनी अनेकांना जाळलं किंवा त्यांचे तुकडे केले आहेत. लोऊकचे किबुत्झ रेइम येथील नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधून अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी तिला जबरदस्तीने गाझा पट्टीत नेलं होतं.


Spread the love

Related posts

भंडारी समाज उत्कर्ष मंडळाचे मा.अध्यक्ष श्री.साबाजी मयेकर यांचे दुःखद निधन

news

हिंदु समाजाच्‍या संयमाचा अंत पाहू नका! आमदार नितेश राणे!

news

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत ७२ रिक्त जागांसाठी होणार भरती !

news

Leave a Comment