स्पोर्ट

लांजा तालुका स्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धा उस्तहात सप्नन!

Spread the love

लांजा: क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा तालुका स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा लांजा तालुका शारीरिक शिक्षक संघटना व तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा यांचा सहकार्याने घेण्यात आली.

 या स्पर्धेचे उद्घाटन लांजा- राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लांजा गटशिक्षणअधिकारी बंडगर साहेब, विस्तार अधिकारी सावंत साहेब, उद्योजक मुन्ना खामकर,तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा व उद्योजक किशोर यादव सर, लांजा तालुका क्रिडा समन्वयक निलेश बागडी,तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी सचिव व राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक,पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, सदस्य रोहीत कांबळे,तायक्वॉंदो प्रशिक्षक हर्षराज जड्यार व सर्व क्रिडा शिक्षक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.या स्पर्धेमद्ये लांजा तालुक्यातील एकूण 70ते 80 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.सर्व विजेत्या स्पर्धकांना ,नगर पंचायत लांजा चे नगर सेवक संजय यादव साहेब यांच्या सौजन्याने सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक,देण्यात आले.

या स्पर्धेचे पंच म्हणून नॅशनल पंच तेजकुमार लोखंडे, मयुरी खांबे, शितल आचरेकर, तेजस्विनी आचरेकर, गौरव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्तम रित्या पार पडल्या.तसेच या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडूंचे २५ व २६ रोजी जिल्हा स्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धे करीता निवड झालेली आहे तसेच या सर्व खेळाडूंना फुडील वाटचालीस शुभेच्छा.


Spread the love

Related posts

गोवा येथे राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील परी जड्यार व योगेश तोंडारे यांची कांस्य पदकाची कमाई.

news

सिंधू रनर्स टीम २०२४ ची दमदार सुरवात…!

news

अक्कलकोट मध्ये थ्रोबॉल व सॉफ्टफुटबॉल राज्य स्पर्धेचे थाटात उदघाटन…!

news

Leave a Comment