स्टोरी

कुणकेश्वर येथे १६ ऑक्टोबर रोजी डबलबारी भजन सामना!

Spread the love

बुवा अक्षय बोरकर विरुद्ध  बुवा श्री संतोष जोईल यांच्यात सामना….

 

मसुरे प्रतिनिधी: 

 

नवरात्र उत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिर कुणकेश्वर येथे १६ ऑक्टोबर रोजी रात्री ठीक नऊ वाजता आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. कोकण रत्न बुवा संतोष शिरसेकर व बुवा श्री अभिषेक शिरसाट यांचे शिष्य बुवा अक्षय बोरकर (मुणगे- देवगड) विरुद्ध भजनसम्राट बुवा श्री श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य बुवा श्री संतोष जोईल या दोन भजनी बुवांमध्ये हा सामना रंगणार आहे. अक्षय बोरकर यांना पखवाज तुषार शिंदे, तबला सुनील बोरकर (मुणगे) आणि चकवा मनोज सावंत हे साथ करणार आहेत. तर बुवा संतोष जोईन यांना पखवाज अक्षय मेस्त्री, तबला मांगिरीश घाडी हे साथ करणार आहेत. भजन प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जोगेश्वरी मंडळ कुणकेश्वर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांच्या मृत्यूची जबाबदारी युवराज लखमराजे यांनी स्वीकारावी! डॉ. जयेंद्र परुळेकर

news

१७ व १८ मे रोजी दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात श्री दत्तयागाचे आयोज

news

फ्लॉरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली येथे फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्सचा प्रारंभ!

news

Leave a Comment