स्टोरी

हिंदू विरोधी कायदा संमत करणाऱ्या विधेयकाला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी रोखले!

Spread the love

८ ऑक्टोबर वार्ता:  कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने मार्च २०२३ मध्ये SB-403 हे विधेयक संमत केले होते. हिंदू धर्मातील विशिष्ट प्रथा परंपरा या भेदभाव करणाऱ्या आहेत, असा दावा करून संपूर्ण हिंदू धर्मालाच बदनाम करण्याचे काम या विधेयकात करण्यात आले होते. हिंदूंच्या धार्मिक प्रथा भेदभाव करणाऱ्या आहेत असे या विधेयकात सूचित करण्यात आले होते. या विधेयकाची सर्व भाषा भेदभाव विरोधाची होती, पण ती हिंदू धर्म आणि दक्षिण आशियाई हिंदू समाज यांच्या विषयी प्रचंड गैरसमज निर्माण करणारी होती. त्यामुळे अमेरिकन हिंदू फाउंडेशनने या विधेयका विरोधात कॅलिफोर्निया राज्यात मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आपल्या अधिकारातील नकाराधिकार अर्थात व्हेटो वापरून SB-403 हे विधेयक रोखले आहे.

कॅलिफोर्निया राज्यामध्ये आधीच लिंग, वंश, रंग, धर्म, राष्ट्रीय मूळ, विकलांगता, लैंगिक ओळख अथवा लैंगिक झुकाव त्याच बरोबर अन्य आधारांवरचे भेदभाव रोखणारे कायदे आधीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यासाठी कोणत्याही नव्या कायद्याची गरज नाही. म्हणून आपण SB-403 नावाने ओळखल्या जाणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी करत नाही तर व्हेटो वापरतो, असे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी स्पष्ट केले. गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी SB-403 विधेयक भेटो वापरून रोखल्याबद्दल हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (HAF) समाधान व्यक्त केले आहे.


Spread the love

Related posts

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा.

news

तिलारी प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी मलिदा मिळवून देणारा प्रकल्प! युवासेना

news

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सापांविषयी कार्यशाळेचे आयोजन.

news

Leave a Comment