राजकारण

मी सुद्धा या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष आहे! मंत्री छगन भुजबळ

Spread the love

७ ऑक्टोबर वार्ता: गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्र्रवादी पक्षाच्या चिन्हांवरून वाद सुरु असून निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार निवडणूक आयोगाकडे सतत लक्ष ठेऊन आहेत. यावर छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?….                     पवार साहेब म्हणाले होते की मी काही कोर्ट कचेरी करणार नाही. पण आता कालपासून बघतो आहे, स्वतः पवार साहेबच तिकडे इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले. ते सांगतात की राष्ट्रवादी पक्षाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे कि, मी संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही ? ज्यावेळी शरद पवार काँग्रेसच्या बाहेर पडले. त्यावेळेला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी उजवा हात म्हणून मी काम पाहिले. मी सुद्धा या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष आहे, आमचाही पक्ष बांधणीत खारीचा वाटा आहे, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.


Spread the love

Related posts

सावंतवाडीतून पुन्हा दीपक केसरकर निवडणूक लढवतील! उदय सामंत

news

बातमी राज्यातील सत्तासंघर्षाची! सत्तासंघर्षाची सुनावणी आज ही अपूर्ण.

news

शेतकरी हीच आमची जात!! विरोधी पक्ष नेते अजित पवार सरकारवर हल्लाबोल

news

Leave a Comment