स्टोरी

इस्राईलमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा.

Spread the love

देश विदेश: इस्राईलमध्ये आज शनिवार दि.  ऑक्टोबर सकाळी ४ वाजल्यापासून गाझा पट्ट्यातून हमास दहशतवादी संघटना इस्त्रायलच्या प्रदेशावर हल्ला करत आहे.  हमास आणि इस्लामिक जिहादने आतापर्यंत किमान २२ नागरिकांना ठार केले आहे. आज झालेल्या या हल्ल्यामध्ये ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात गाझामधून इस्राईलमध्ये घुसखोरी करुन देशाच्या दक्षिणेकडील आणि मध्य प्रदेशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने शनिवारी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. इस्राईलने गाझा पट्टीमध्ये एअर स्ट्राईक करण्यास सुरुवात केली आहे. इस्राईलच्या एअर फोर्सने देखील एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी असणाऱ्या हमास दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं जात आहे.


Spread the love

Related posts

वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला अपघात.

news

मिलाग्रिस प्रशालेमध्ये हरित मंचाची स्थापना!

news

लहान वयापासून स्मार्टफोन (मोबाईल) वापरल्यास मानसिक आजारांचे प्रमाण अधिक!

news

Leave a Comment