राजकारण

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शांततेत होण्यासाठी १ हजार ७०० पोलीस तैनात!

Spread the love

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी येथे १ हजार ७०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शहर पोलीस दलाकडून या बंदोबस्ताचे आयोजन केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर्. राजा हेही पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी शहर पोलीस दलातील १०० पोलीस अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलातील ५०० सैनिक आणि राज्य राखीव पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी शीघ्रकृती दलाच्या तुकड्याही तैनात रहाणार आहेत. ७६ केंद्रावरील २७० बुथवर मतदान होणार असून ९ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. मतदान केंद्रांपासून १०० मीटर अंतरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपर्‍या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता भरारी पथकांनी नाकाबंदीत ३२ लाख १८ हजार रुपये एवढी रक्कम कह्यात घेऊन ती रक्कम निवडणूक अधिकार्‍यांकडे सुपूर्द केली. अवैध शस्त्र बाळगणार्‍यांकडून ११९ शस्त्रे जप्त केली असून ३२ हजार ८८५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.


Spread the love

Related posts

वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची दोन तास चर्चा!

news

शरद पवार यांच्या त्यागपत्रावर आता बोलणार नाही! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश…!

news

Leave a Comment