स्टोरी

युवतीने हिंदू देवतांची विटंबना करणारी पोस्ट टाकल्याने भाजपा आक्रमक!

Spread the love

कणकवली: पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा आणि हिंदू देवतांची विटंबना करणारी पोस्ट येथील युवतीने इंस्टाग्रामवर (सोशल मिडिया ) टाकल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल होत पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी चर्चा करत संबंधित युवतीवर आणि कणकवली शहरात परप्रांतीय फळ विक्रेते आहेत, यांची कसून चौकशी करावी अशी मागणी देखील आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यावर पोलीस पोलीस निरीक्षकानी तातडीने कारवाईच्या आश्वासन दिले आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले कि, कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ जलाराम सॉ मिलच्या मागे येथील एका युवतीने १४ ऑगस्ट, २०२३ रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अतिआनंद करणारी व त्यानिमित्त स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा, अशा प्रकारचा आक्षेपार्ह संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. तसेच समस्त हिंदू धर्माचे आदरस्थान असलेल्या हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. जाणीवपूर्वक हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचा व दोन गटामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताचा स्वातंत्र्य दि . १५ ऑगस्ट, २०२३ दिवशी आहे हे माहित असताना देखील जाणूनबुजून जिल्ह्यातील वातावरण बिघडविण्याकरिता पाकिस्तान स्वातंत्र्याची पोस्ट व्हायरल केली. देश अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना केलेले कृत्य योग्य नाही. त्यामुळे तिने केलेले कृत्य धार्मिक तेढ निर्माण करणारे व देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा निर्माण करणारे आहे तरी अशा अपप्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी आपण तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची भेट घेतली. भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बँक संचालक प्रज्ञा ढवण, समीर सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, सावेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभूगावकर, निखिल आचरेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाची व मालवण शासकीय विश्रामगृहाच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

news

कल्याण पूर्वेतील ‘यु टाईप’ रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतच्या सुनावणीला हजर रहाण्याचे महापालिकेने केले जाहिर फलकाद्वारे आवाहन!

news

माझा या ज्ञान मंदिरा! वेरली गावातील शाळा शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त प्रफुल्ल देसाई यांनी लिहिलेला लेख…. नक्की वाचा

news

Leave a Comment