क्राईम

पिंगुळी येथे दारू व कारसह १ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त!

Spread the love

पिंगुळीतील पंधरा दिवसातील तिसरी कारवाई….

कुडाळ:

पिंगुळी मोरजकरवाडी येथे छापा टाकून गोवा बनावटीची दारू व कारसह १ लाख ८ हजार २० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कुडाळ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ६.१० वा केली.याप्रकरणी सुनिल शंकर अंबिगेर वय-36 वर्षे सध्या रा. पिंगुळी मोरजकरवाडी  मुळ राहणार – कुडाळ नाबरवाडी यांच्या वर ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. पिंगुळीतील पंधरा दिवसातील ही तिसरी कारवाई आहे.

पिंगुळी मोरजकरवाडी येथे चोरटा दारूचा व्यवसाय चालतो. अशी माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली. यानुसार कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलीस पिंगुळी मोरजकरवाडी येथे सायंकाळी ५.५० वा गेले. यावेळी पिंगुळी मोरजकरवाडी येथे एका अंगणवाडी नजीक एक निळ्या रंगाची वेगनर कार एक नंबरप्लेट अर्धवट तुटलेल्या अवस्थेत व चालकासह आढळली. यावेळी पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी या चालकास खाली उतरवत गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीत मागच्या सीटवर दोन पिशव्या आढळल्या. या पिशवीत तपासणी केली असता यात गोवा बनावटीची दारू आढळली. या वेळी चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने सुनिल शंकर अंबिगेर वय-36 वर्षे सध्या रा. पिंगुळी मोरजकरवाडी  मुळ राहणार – कुडाळ नाबरवाडी असल्याचे सांगितले. याप्रकरणी त्याला दारू, कारसह ताब्यात घेत गोवा बनावटीची दारू गैरकायदा बिगरपरवाना आपले ताबे कब्जात बाळगून त्याचे ताब्यातील मारुती सुझुकी वॅगनर या गाडीतून वाहतुक करत असताना मिळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या कारमध्ये ८ हजार २० रू ची दारू व कारसह १ लाख ८ हजार २० रू चा मुद्देमाल कुडाळ पोलिसांनी जप्त केला. या घटनेची फिर्याद पोलीस स्वप्नील चव्हाण यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गंभीर प्रकरणात अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर झाल्याने सार्वजनिक जबाबदारी धोक्यात.

news

मुलीनेच केली जन्मदात्या आईची हत्या!

news

‘पुणे इसिस मॉड्यूल’ प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक, सहाही आरोपी धर्मांध !

news

Leave a Comment