स्टोरी

कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार!

Spread the love

आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश’

कुडाळ आगारात आज एक स्लीपर एसटी होणार दाखल…..

कुडाळ: कुडाळ व मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती.त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने व सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ व मालवण आगारासाठी नवीन एसटी गाड्या देण्याची मागणी केली होती.ही मागणी मान्य करत कुडाळ आगारासाठी ६ स्लीपर व ४ साध्या अशा एकूण १० नवीन एसटी गाड्या आणि मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या देण्याचे शेखर चन्ने यांनी मान्य केले होते. यातील १ स्लीपर गाडी आज कुडाळ आगारात दाखल होणार आहे. अन्य गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.


Spread the love

Related posts

जलसमाधी आंदोलनासारखी टोकाची भूमिका जिल्ह्यातील उमेदवारांनी घेवू नये! शिक्षण मंत्री दिपक केसरकर….

news

गोवा राज्यातील डिचोली गांवातील मये पुण्यभूमी येथील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई देवीचा , श्री देवी महामाया आई देवीचा स्वयंभू श्री देव मयेकर कुळकार दैवताचा वर्धापनदिन

news

गौतमी पाटील हिला शाळेत नाचवणारे घरी जातील! शिक्षण मंत्री दिपक केसरकर

news

Leave a Comment