स्टोरी

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या स्वच्छता दूतांना सामाजिक बांधिलकीची साथ!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अन्यायाविरुद्ध उपाशी तपाशी लढत असलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या शहराच्या स्वच्छता दूतांना सामाजिक बांधिलकीच्या समीरा खलील यांच्या पुढाकारातून दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. वर्षाचे बाराही महिने शहराचा केर कचरा व घाण उचलणाऱ्या या ६० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आज उपासमाराची वेळ आहे. सावंतवाडी शहरातील केरकचरा व घाण उचलून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने पगार नसून तीन वर्षाचा पीएफ ही ठेकेदाराकडून देण्यात आला नाही. अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

याकरिता हे कंत्राटी सफाई कामगार सावंतवाडी नगरपरिषद समोर दोन महिन्याचा पगार व तीन वर्षाचा पीएफ मिळावा याकरिता ठिय्या आंदोलन करत आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरणे दुरच राहिलं, उलट आज त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळी आली आहे. यासाठी ते अन्यायाविरुद्ध लढत आहेत आणि या त्यांच्या लढ्यासाठी सावंतवाडी शहरातील नागरिकांनीही सहभाग घेतला आहे. तसेच सामाजिक बांधिलकीने त्यांच्या उपाशी आंदोलन करत असलेल्या ची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीच्या समीरा खालील यांनी पुढाकार घेऊन त्यांना भोजन व्यवस्था केली आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे.

यासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, हेलन निबरे, संजय पेडणेकर, सतीश बागवे, शैलेश नाईक, शाम हळदणकर, शरद पेडणेकर, अशोक पेडणेकर, शेखर सुभेदार, प्रसाद कोदे व सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मणियार या सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केले. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी प्रार्थना ईश्वरचरणी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते करत आहेत.


Spread the love

Related posts

हडी येथे ५ रोजी ‘एक डाव भुताचा’ नाट्यप्रयोग.

news

भानुदास चिंदरकर यांचे निधन!

news

शिवसेना कणकवलीच्या वतीने उद्या शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव.

news

Leave a Comment