स्टोरी

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव २०२३ खुली निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव २०२३ यामध्ये खुली निबंध स्पर्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत प्रथम सावंतवाडीतील नारायण उर्फ अरुण जगन्नाथ वझे तर द्वितीय इन्सुली येथील सौ विशाखा विश्राम पालव, तृतीय मालवण येथील शर्वरी प्रमोद प्रभू मिराशी,  उत्तेजनार्थ संपदा प्रमोद सावंत सावंतवाडी आरपीडी हायस्कूल जूनियर कॉलेज,  भिकाजी राजेंद्र देसाई बांदा खेमराज हायस्कूल शालेय गट,  उत्तेजनार्थ अदिती किशोर रावराणे कळसुलकर हायस्कूल.

या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बांदा मालवण कुडाळ दोडामार्ग आधी भागातून शालेय व खुल्या गटातून निबंध आले होते. या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परीक्षक कारिवडे हायस्कूलच्या माध्यमिक शिक्षिका अर्चना सावंत व देशभक्त शंकरराव ग वाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या १८ ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता मान्सून महोत्सवाचा समारोप सोहळा रामेश्वर प्लाझा बिल्डिंग सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालय जवळ होणार आहे. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ,  माजी नगराध्यक्ष संजू परब, अध्यक्ष रवींद्र मडगावकर, विजय चव्हाण, प्रल्हाद तावडे, विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर आदींच्या उपस्थितीत राहणार आहेत. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन कार्यवाहक ॲड. संतोष सावंत व सचिव प्रताप परब आदींनी केले आहे.


Spread the love

Related posts

पुणे येथील ससून रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याची शक्यता ! सुराज्य अभियान

news

आरे देवीचीवाडी केंद्रशाळा देवगड तालुक्यात द्वितीय…!

news

शिवसेनेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी विनामूल्य गाड्या सोडण्यात येणार !

news

Leave a Comment