स्टोरी

राहुरीत (अहिल्‍यानगर) पुन्‍हा ‘लव्‍ह जिहाद’!

Spread the love

वाढत्‍या लव्‍ह जिहादच्‍या घटना रोखण्‍यासाठी अन्‍वेषण सीबीआयकडे देण्‍याची मागणी !

जिल्‍हा अहिल्‍यानगर: येथील लव्‍ह जिहादच्‍या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. येथे एका मुलीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून तिचे छायाचित्र सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणार्‍या अतिक सय्‍यद याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्‍या आईने तक्रार दिली आहे. येथील लव्‍ह जिहाद आणि धर्मांतराचे प्रकार थांबलेले नाहीत. यामागे पुष्‍कळ मोठे जाळे असून जोपर्यंत हे जाळे उद़्‍ध्‍वस्‍त होत नाही, तोपर्यंत हे प्रकार घडतच रहाणार आहेत. यामागचे धागेदोरे शोधून काढण्‍यास पोलीस प्रशासन पूर्णपणे अयशस्‍वी ठरले असून या घटनेचे अन्‍वेषण सीबीआय किंवा इतर संस्‍थेला देण्‍यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्‍यातून होत आहे.

उंबरे, देवळाली प्रवरा, वांबोरी, पानेगाव, केंदूळ, बारागाव नांदूर, शिलेगाव, कोंढवड यांसह राहुरी तालुक्‍यातील इतरही गावांमध्‍ये अशा प्रकारच्‍या घटना घडलेल्‍या आहे. यातील अनेक कुटुंबे प्रतिष्‍ठित असल्‍याने या घटना उघडकीस आलेल्‍या नाहीत; परंतु आता पालकवर्गामध्‍ये जागृती झाल्‍याने या घटना उघडकीस येत आहेत.


Spread the love

Related posts

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दिव्यांग मुलांना साहित्यांचे वाटप!

news

नवीन वर्षाची सुरुवात “बँक खाते” ब्लॉक च्या मेसेजने…!

news

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाकार्य करा : गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे

news

Leave a Comment