क्राईम

केरळच्या मलप्पुरम येथे पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी !

Spread the love

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केली कारवाई !

१४ ऑगस्ट वार्ता: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बंदी घालण्यात आलेल्या *पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) जिहादी* कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील रिरूर येथे ही छापेमारी १३ ऑगस्टच्या सकाळपासून चालू करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मलप्पुरम येथील ‘पी.एफ्.आय.’च्या मुख्यालयावरही छापा टाकण्यात आला होता.केंद्रशासनाने सप्टेंबर २०२२ मध्ये या संघटनेवर बंदी लादली होती. या संघटनेच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले असून अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर हत्येचे गुन्हे नोंद आहेत.


Spread the love

Related posts

राष्ट्रीय तपास यंत्रणेची जबलपूर येथे छापेमारी!

news

नवी मुंबईत पुन्हा उघडला ‘माया व्हीआयपी’ बार; रात्री उशिरापर्यंत अश्लील कृत्यांचा धडाका

प्रसाद परब

केरळच्या समुद्री परिसरात १५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त….

news

Leave a Comment