स्टोरी

लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत मध्यप्रदेशात पहिली शिक्षा !

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा झाल्यानंतर प्रथमच एका मुसलमानाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंदूर येथील हे प्रकरण असून महंमद साबिर खान असे या लव्ह जिहाद्याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यात ५ वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेचा अंतर्भाव आहे, तसेच त्याला ५६ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ‘मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम २०२१’च्या कलम ३/५ यांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१. विशेष लोकाधिवक्त्या सुशीला राठौर यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना सांगितले की*, २० वर्षीय महंमदने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चाकूच्या धाकावर ९ सप्टेंबर २०२० या दिवशी तिच्यावर बलात्कार करून तिला इस्लाम स्वीकारण्यास बाध्य केले. हे कृत्य समाजावर विपरीत परिणाम करणारे असल्याने त्याला कठोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

२. मंहमदने पीडितेवर बलात्कार केल्यानंतर काही दिवसांनी तो तिच्या घरी गेला आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. या वेळी त्याने तिची अश्‍लील छायाचित्रे काढून त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो जे सांगेल, त्या प्रकारे वागण्यासाठी तिला बाध्य केले. जर तिने तोंड उघडले, तर व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली. यामुळे ती आणि तिचे कुटुंबीय आत्महत्या करण्यास बाध्य होतील, अशा प्रकारे त्याने तिला घाबरवले.

 

३. कालांतराने त्याने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. काही दिवसांनी पीडितेने तिच्यावरील अत्याचारांविषयी घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आणि महंमदला अटक झाली.


Spread the love

Related posts

पावनाई स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने मसुरेत माजी सैनिक आणि त्यांच्या विर पत्नीचा “वीर जवान तुझे सलाम” असा अनमोल सन्मान..

news

कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यास विरोध !

news

मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ!

news

Leave a Comment