स्टोरी

९५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ आणि कोकणवासियांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोधच !

Spread the love

केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेऊन रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची स्पष्टोक्ती
रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध आता कोकणात पसरून तो राज्यव्यापी होत आहे. पंचक्रोशीतील ९५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ आणि कोकणवासी हा प्रकल्प होऊ देणार नाहीत, अशी स्पष्ट माहिती बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांना देहलीतील त्यांच्या संसदीय कार्यालयात भेटून दिली. या वेळी ही सर्व सूत्रे आणि ग्रामस्थांचा संघर्ष याची पूर्ण कल्पना असल्याचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

 

या वेळी ठाकरे गटाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, वैभव कोळवणकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मंत्र्यांच्या या भेटीमध्ये बारसू ते देवाचे गोठणेच्या सड्यावर असलेल्या १० सहस्र वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचे महत्त्व, आंबोळगड-राजवाडी किनार्‍याची जैवविविधता आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र (सी.आर्.झेड.) वर्गवारीविषयीची माहिती पेट्रोलियम मंत्र्यांना देण्यात आली.


Spread the love

Related posts

माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने निश्चय व इच्छा शक्तीच्या जोरावर योग्य नियोजन करून राज्यातील प्रसिद्ध चार मंदिरामध्ये भजन सेवा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण

news

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली ब्रिजवर इर्टीगा कार अपघात….!

news

Leave a Comment