स्टोरी

निवृत्त हवालदार बाबू गुरव यांचे निधन.

Spread the love

आंबोली प्रतिनिधी: आंबोली गुरववाडी येथील भारतीय सैन्य दलातील निवृत्त हवालदार बाबू सोनू गुरव (८१) यांचे शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात, गोवा आदी ठिकाणी सेवा बजावली. भारतीय सैन्य दलात हवालदार पदावरून ते निवृत्त झाले. शांत आणि मनमिळावू स्वभाव,दुसर्‍यांच्या मदतीला धावणारे, बाबू गुरव सेवाभावी वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गुरव कुटुंबीयांचे सांत्वन केले.माजी सैनिक सोनू गुरव ,कारिवडे भैरववाडी प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक रविंद्र गुरव, दोडामार्ग येथील राॅयल फोटो स्टुडिओचे मालक मनोहर गुरव, योगशिक्षक एकनाथ गुरव यांचे ते वडील तर ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांचे ते भावोजी होत. त्याच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Spread the love

Related posts

श्री समर्थ साटम महाराज वाचनालय दाणोली येथे “वाचन प्रेरणा दिन” निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे….

news

सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नॅशनल पेन्शन स्किममध्ये सुधारणा करण्याची गरज! वित्तमंत्री निर्मला सीतारमन

news

Leave a Comment