स्पोर्ट

प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या महिला आघाडीने जपली सामाजिक बांधिलकी.

Spread the love

मालवण प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्या महिला आघाडीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन उपक्रम साजरा केला. समाजातील अतिशय महत्त्वाचा परंतू दुर्लक्षित घटक असलेल्या मालवण नगरपरिषदेच्या ३५ सफाई कामगारांना महिला शिक्षकांनी रक्षाबंधन करून अनोखी सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी सफाई कामगारांना हँडग्लोव्हज भेट देण्यात आली.या उपक्रमाचे सफाई कामगार यांनी कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संघटनेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शिक्षक भारती महिला अध्यक्षा अमिता भाबल, सचिव आस्मा तांबोळी, नम्रता पावसकर, निलम बोर्डवेकर, पुजा शिरोडकर, स्मिता गावडे,ममता कुबल, रिया झोरे,मैना कारंडे, पुजा विभुते, उज्वला चौकेकर, राखी शिंदे, कोमल कांबळे, राधा घोगरे, सोनाली देवकर, चित्रा गुंजाळ, भाग्यश्री कुन्नुरे, शितल पाटील, माधुरी फुंडे, समीना देसाई, सुप्रिया सकडे, उर्मिला दळवी या महिला शिक्षक भारती सदस्या उपस्थित होत्या.


Spread the love

Related posts

D.J. सामंत स्कूल लांजा, येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

news

सावंतवाडीचा रामदास राऊळ सिंधुदुर्ग श्री चा मानकरी!

news

आनंद वैद्य व सुभाष गोवेकर कोकण मराठी साहित्य परिषदच्या आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांने सन्मानित.

प्रसाद परब

Leave a Comment