स्टोरी

शितल परुळेकर आदर्श शिक्षक पुरस्कारांने सन्मानित..

Spread the love

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यात १९वर्षे कार्यरत असलेल्या शितल परुळेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नितेशजी राणे यांच्या हस्ते 1 मे रोजी वितरित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मा अनिल पाटील,शिक्षणाधिकारी डॉ कमळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातून उपक्रमशील, उच्च विद्याविभूषित, अभ्यासू व प्रतिभासंपन्न शिक्षिका तथा मुख्याध्यापिका शितल परुळेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी गेली सतरा वर्षे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून गुणवत्ता व लोकसहभाग यासाठी उत्कृष्ट व आदर्श काम केले. त्यानंतर 1 वर्ष पेंडूर खरारे शाळेत ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा, ज्ञानी मी होणार उपक्रमाद्वारे शाळेने जिल्हास्तरीय यश संपादन केले. सध्या त्या बदलीने आंबोली कामतवाडी शाळेत शिक्षणसेवा देत आहेत. त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षांमध्ये मुलांना भरघोस मार्गदर्शन करून जिल्हा व राज्यस्तरावर यश प्राप्त करून दिले आहे. त्यांनी अनेक जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पुरस्कार संपादित केले आहेत. त्यांनी लोकसहभागातून १० लाख रूपये खर्चुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा काळसे बागवाडा व तिसरी आयएसओ मानांकित शाळा करण्याचा मान मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक ,पालक व ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. तसेच शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष पाताडे ,महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे अध्यक्ष गणेश नाईक,कुडाळ शिक्षक भारती अध्यक्ष विनेश जाधव यांनी अभिनंदन केले.


Spread the love

Related posts

कुंदे गावात आ. वैभव नाईक यांची विकास कामांची वचनपूर्ती…!

news

तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास!

news

माजी आ. राजन तेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी चालकांच्या पाठीशी.

news

Leave a Comment