स्टोरी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण.

Spread the love

मालवण प्रतिनिधी: मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षानी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं की, पहिल्यापेक्षा भव्य आणि टीकणारा पुतळा उभारण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी सांगितल्याप्रमाणे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आता नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून पूर्ण झाला आहे. पहिल्यापेक्षा आकर्षक आणि वजनदार पुतळा उभाराण्यात आला आहे.

 

नव्याने उभारण्यात येणाऱ्या शिवरायांचा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनविण्यात आला आहे. पुतळ्याच्या उभारणीत डुप्लेक्स स्टेनलेस स्टील आणि ब्रॉन्झ धातू वापरला जातोय. त्यामुळे हा पुतळा वर्षानुवर्षे टिकेल असं शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितलं आहे. हा पुतळा बघण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ मे ला सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर आहेत.  यादरम्यान राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.

 


Spread the love

Related posts

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला सामाजिक बांधिलकीकडून इन्व्हर्टर भेट

news

मिल मजदूर संघ आयोजित एनटीसी मिल कामगारांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर!

newss

कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यामध्ये असेंट टेक्नो सोल्युशनचे मोठे योगदन लाभेल! : आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन

news

Leave a Comment