स्टोरी

उद्या स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन..! भालावल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी ५ मे रोजी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. जिजाबाई सावंत या सेवाभावी व परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून भालावाल परिसरात परिचित होत्या. पतीच्या अकाली निधनानंतर काबाडकष्ट करून त्यांनी मुलांचे पालन पोषण करताना त्यांना चांगले शिक्षण दिले. त्यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी सावंत कुटुंबीयांनी गावात स्व. जिजाबाई सावंत स्मारक साकारले असून या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.

यानिमित्त सकाळी पुजा, अभिषेक, गणपती पुजन, ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात होम हवन, तरपण विधी, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी भजन, किर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. जिजाबाई सावंत यांचे सुपुत्र शिवा सावंत, भदू (आबा) सावंत, रमेश सावंत, डॉ सुभाष सावंत, मंगेश सावंत यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

श्री प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर वाढदिवस विशेष

news

नरेश म्हस्के यांच्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाहीत! अजित पवार.

news

यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड!

news

Leave a Comment