स्टोरी

श्री देव जैन भरतेश्वर मंदीर येथे आज त्रिपुरी पौर्णिमा उत्सव….!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

कसाब मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती श्री देव जैन भरतेश्वर मंदीर येथे रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ७ वा.श्रीची विधीवत पूजा अर्चा, सायंकाळी ७ वा. गावच्या रहाटी नुसार टीपर व दीप प्रज्वलन, घटपुजा, रात्रौ १० वा. दीपोत्सव सोहळा, रात्रौ १०:३० वा. शाही पालखी सोहळा, रात्रौ ११:३० वा. तेंडोलकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वा. गाडगा फोडणे व दह्याचा काला. सकाळी ६ वाजता श्रीची पलाखी मिरवणूक, रमाई नदीपात्रात श्रीचे अभ्यंग शहीस्नान तदनंतर श्री देवी माऊली मंदिर येथे शिव शक्ती भेट सोहळा असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री देव भरतेश्वर मंदिर ट्रस्ट व सर्व मानकरी गावरहाटी कसबा मसुरे, यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशनतर्फे मसुरेतील २० मुले दत्तक

news

‘सम सकला पाहू’ या भावनेतून सेवाकार्य करा : गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे

news

गोरख रामदास ठाकूर व मित्रपरिवार आणि खोपटे भाजपाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन.

news

Leave a Comment