स्टोरी

कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक एनसीसी अधिकारी गोपाळ गवस यांचा सत्कार

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: माननीय दीपकभाई केसरकर महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व मराठी राजभाषा मंत्री यांच्या मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा जाहीर सत्कार समारंभ सावंतवाडी नगर परिषदेच्या काझी शहा बुद्दीन हॉलमध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी माननीय श्री. प्रशांत पानवेकर साहेब उपस्थित होते. यावेळी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचा कुमारी सार्जंट स्वरांगी संदीप खानोलकर हिने गणतंत्र दिवस शिबिरामध्ये नवी दिल्ली येथे केलेल्या उज्वल कामगिरीबद्दल तिचे प्रशिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर हिचे कौतुक करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य एन. पी.मानकर व स्वरांगीच्या आई स्वप्नजा खानोलकर यादेखील उपस्थित होत्या. व्यासपीठावर सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजनजी पोकळे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी आंगणे साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संचालक मंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुमारी स्वरांगी खानोलकर व सहाय्यक शिक्षक एनसीसी अधिकारी व्यवस्था यांचे अभिनंदन केले.


Spread the love

Related posts

शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह.

news

१३ वर्षे होऊनही बाळगंगा धरणग्रस्‍तांचे पुनर्वसन आणि मोबदलाही नाही !भूमी देऊन शेतकर्‍यांच्‍या पदरी निराशाच !

news

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान !

news

Leave a Comment