स्टोरी

व्हॉट्सअ‍ॅपवर +92, +84 किंवा +62 नंबरवरून कॉल येत असल्यास त्वरित ब्लॉक करा आणि तक्रार करा!

Spread the love

५ ऑगस्ट वार्ता: व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांदा परदेशी क्रमांकावरून कॉल येत असतात. परंतु, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या कॉल्स किंवा मेसेजला उत्तर दिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.काही काळापूर्वी लोकांनी ट्विटरवर याबद्दल तक्रार केली होती की त्यांना परदेशी नंबरवरून कॉल येत आहेत. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने एक निवेदन जारी करून युजर्सना अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. तुम्हालाही अनोळखी नंबरवरून मेसेज किंवा कॉल येत असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना मलेशिया, केनिया, व्हिएतनाम आणि इथिओपियासारख्या देशांमधून कॉल येत आहेत. जर तुम्ही नवीन सिम घेतले असेल तर हे कॉल्स आणखी येतात. या कॉल्सचा उद्देश काय आहे हे सध्या तरी कळलेले नाही. व्हॉट्सअ‍ॅपने लोकांना आवाहन केले आहे की जर त्यांना परदेशी नंबरवरून कॉल आले तर त्यांनी ताबडतोब ब्लॉक करून कळवावे. जेणेकरून कंपनी असे नंबर प्लॅटफॉर्मवरून काढून टाकू शकेल.यासोबतच कंपनीने सांगितले की, ते एआयच्या माध्यमातून असे नंबर ओळखण्यावर काम करत आहेत. जेणेकरून ते ब्लॉक केले जाऊ शकतील. त्यांनी मे महिन्यात प्लॅटफॉर्मवरून 65 लाखांहून अधिक नंबर काढून टाकली आहेत.


Spread the love

Related posts

रेल्‍वेत बाँबस्‍फोट करण्‍याच्‍या संशयास्‍पद संदेशानंतर महाराष्‍ट्रातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी!

news

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा…!

news

अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते सन्‍मान…!

news

Leave a Comment