स्टोरी

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरण अपडेट्स!

Spread the love

४ ऑगस्ट वार्ता: नितीन देसाई यांनी आपल्याच स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला. नितीन देसाई हे चित्रपटांचे भव्य सेट डिझाईन करण्यासाठी ओळखले जात होते. चित्रपटाचा सेट डिझाइन करणाऱ्या नितीन देसाईनी स्वतःच्या मृत्यूचा सेटही डिझाइन केला होता. एनडी स्टुडिओसाठी सेट डिझाइन करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, नितीन देसाई यांनी त्यांच्या मृत्यूचा सेट डिझाइन केला होता. नितीन देसाई यांनी एक मोठा धनुष्यबाण बनवला होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या धनुष्यबाणाच्या मधोमध गळफास घेऊन नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक टेपरेकॉर्डरही मिळाला आहे, ज्यामध्ये त्याची सुसाईड नोटही नोंदवण्यात आली आहे. त्यांच्या आवाजातील संदेशात एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नितीन देसाई यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. प्राथमिक निकालानुसार नितीन देसाईंचा फाशीमुळे मृत्यू झाला.


Spread the love

Related posts

गोव्यातील ‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सवा’त मंदिर विश्वस्तांचा निर्धार!

news

अमृत योजनेअंतर्गत कल्याण ग्रामिण मधील भाल गावात जलकुंभाची निर्मिती!

news

सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर मार्गी लावा! रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष मिहिर मठकर

news

Leave a Comment