स्टोरी

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर!

Spread the love

२१ जुलै वार्ता: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मनी लॉनड्रिंगच्या गुन्हयात ईडीने अटक केली होती. अखेर सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. पुणे एमआययडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते. दरम्यान हे प्रकरण 2016 मधील असून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीमध्ये जागा खरेदी केल्याचा आरोप होता. खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.


Spread the love

Related posts

सातोसे येथील आजारी वृद्ध महिलेला सामाजिक बांधिलिकीची मदत.

news

जनता हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष कै. रघुनाथ अनंत टोपले यांचा २४ वा स्मृतिदिन साजरा…!

news

‘ऑल इन वन गुरुजी’ या संस्थेकडून श्री गणेशचतुर्थीला ‘ऑनलाईन’ श्री गणेशपूजेचे विनामूल्य आयोजन !

news

Leave a Comment