स्टोरी

कुडाळ एमआयडीसी येथे रेल्वेचे रूळ पाण्याखाली!

Spread the love

सावंतवाडी: गुरुवारी सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वे प्रवाशांनाही बसला. कुडाळ एमआयडीसी येथे रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्याने मुंबईतून येणारी जनशताब्दी एक्सप्रेस व अन्य मार्गस्थ होणाऱ्या सर्व गाड्या कुडाळ तसेच झाराप व सावंतवाडी येथे अडकून पडल्या. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बराच कालावधी झाला तरी रेल्वे गाड्या मार्गस्थ होत नसल्याने काही लोकांनी गाडीतून उतरून पर्यायी मार्ग स्वीकारला.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनानेही कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या ३ तास उशिराने धावतील असे जाहीर केले आहे. यात मडगाव जंक्शन येथून निघणारी ट्रेन क्र.०११४० मडगाव जंक्शन ते नागपूर विशेष गाडी सायंकाळी ७ वाजता ऐवजी रात्री १० वाजता निघणार आहे.तर ट्रेन क्र. २०११२ मडगाव जं. ते मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस मडगाव जं. येथून सायंकाळी ६ वाजता ऐवजी रात्री ९ वाजता सुटेल. तर ट्रेन क्र. ११००४ सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्स्प्रेसचा सावंतवाडी येथून सायंकाळी ५.५५ वाजता मार्गस्थ होण्या ऐवजी ती रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी मार्गस्थ होणार आहे. या सर्व गाड्या तीन तास उशिरा धावणार असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडीत आज ‘विभागीय कवयित्री संमेलन’ होणार.

news

सापळा रचून पकडलेल्या लाचखोर सरकारी अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात ‘एसीबी’ला अपयश !

news

मनोज नाईक यांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विशेष सत्कार.

news

Leave a Comment