क्राईम

एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तरुणाने प्राणघातक हल्ला!

Spread the love

२७ जून वार्ता: पुण्यातील सदाशिव पेठेत एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणी आज सकाळी कॉलेजला निघाली होती. यावेळी तरुणीसोबत तिचा दुसरा मित्रही होता. सदाशिव पेठेतून जात असताना तरुण त्यांच्या मागून आला आणि अचानक तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी तरुणाने , तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केल्याने ती जखमी झाली. जीव मुठीत घेऊन पळत सुटली. तिचा मित्रही कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती मदत मागत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.

पण ती पळत असताना एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर वार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने त्याचा कोयता धरला त्याला रोखलं. यानंतर इतर लोक पुढे सरसावले आणि हल्लेखोराला चोप दिला. उपस्थितांनी या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

नवी मुंबई येथील अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप ACB च्या ताब्यात.

प्रसाद परब

धक्कादायक : १४ वर्षीय मुलीचे बाप-बेट्यानी केले लैंगिक शोषण. म्हसळा शहरा जवळील खारगांव बुद्रुक येथील घटना.

news

मुंबईत अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍या ९ जणांना अटक !

news

Leave a Comment